पुण्यात दहीहंडी कार्यक्रमानंतर लावणी नृत्यांगना राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल!
पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमानंतर प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष भूषण सोनावणे आणि आयोजक अमोल काटे यांच्यावर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर होऊ नये यासाठी सहभागी कलाकारांकडून रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे प्रशासनाने अनिवार्य केले होते. मात्र, आवश्यक प्रमाणपत्र सादर न झाल्याने कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आली होती.
तरीही कथितरित्या दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली.
📍 पुणे | बिबवेवाडी
🚨 दहीहंडी कार्यक्रमानंतर पोलिसांची कारवाई
#Pune #PuneNews #DahiHandi #RadhaPatil #Lavani #Bibwewadi #MaharashtraNews #BreakingNews #CrimeNews #PunePolice