कर्जत: टोरंट वीज प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या पाठीशी
Karjat, Raigad | Apr 20, 2026 कर्जत तालुक्यात पाली खालाटी मध्ये होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. या ठिकाणच्या आदिवासी लोकांना त्रास आणि त्यांच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे होणारा प्रवेश रोखला जावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन दिले. आदिवासींच्या जमिनीवर टोरंट कंपनीकडून होणारे अतिक्रमण रोखण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.