Dhanivari पुन्हा भीषण अपघात! केमिकल ट्रक थेट घरात घुसला
Dhanivari परिसरात मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. केमिकल वाहतूक करणारा भरधाव ट्रक नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यालगतच्या घरात घुसल्याची घटना समोर आली आहे.
यापूर्वी याच धोकादायक पट्ट्यात झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला होता. तरीही अद्याप रस्त्यावरील सुरक्षा उपाययोजना पूर्णपणे लागू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सुदैवाने या ताज्या घटनेत जीवितहानी टळली असली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकमध्ये रासायनिक पदार्थ असल्याने संभाव्य गळतीची भीतीही व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांनी संरक्षक भिंत, क्रॅश बॅरियर्स आणि सुरक्षित रस्त्याच्या उपाययोजना तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.
#Palghar #HighwayAccident #ChemicalTruck #BreakingNews #RoadSafety MaharashtraNews