MSEB चा डीपी हटवला, पण धोकादायक बेस तसाच! नागरिकांचा संताप
पुण्यातील ससाणे नगर परिसरातील वर्धमान टाऊनशिप आणि रेल्वे लाईन दरम्यानच्या रस्त्यावर गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे फाटकाजवळ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (MSEB) जुना डीपी हटवला असला तरी त्याचा लोखंडी आणि काँक्रीट बेस तसाच सोडून दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
बाहेर आलेले लोखंडी पत्रे आणि अवशेष यामुळे वाहनचालकांना, विशेषतः रात्रीच्या वेळी, अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार येथे अनेक किरकोळ अपघातही घडले आहेत.
याशिवाय या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आशुतोष माने आणि जयवंत साळुंखे यांनी उर्वरित बेस व लोखंडी अवशेष तात्काळ हटवून रस्ता समतल करण्याची मागणी केली आहे.
📍 ठिकाण : Pune
👉 पुणे आणि महाराष्ट्रातील ताज्या स्था