कर्जत: बेंगळुरू-मुंबई एक्स्प्रेसला कर्जतचा थांबा
Karjat, Raigad | May 20, 2026 रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांमधील संपर्क अधिक वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनस बेंगळुरू आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान नियमित 'द्विसाप्ताहिक एक्सप्रेस' सेवा सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गाडीला रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला असून, याचा मोठा फायदा जिल्ह्यातील आणि परिसरातील प्रवाशांना होणार आहे.