कल्याणमध्ये 'Trainx' बॅडमिंटन अकॅडमीचे उद्घाटन; राष्ट्रीय खेळाडू सुधांशू ठाकूर यांचा नवा उपक्रम
कल्याण, प्रतिनिधी : वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करणारे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सुधांशू ठाकूर यांनी १५ वर्षांच्या अथक मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर बॅडमिंटन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्यानंतर त्यांनी स्वतःपुरते न थांबता ५०० हून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण देत त्यांच्या क्रीडा प्रवासाला दिशा दिली. आता त्यांनी कल्याण (पश्चिम) येथील गौरीपाडा, योगीधाम परिसरात "Trainx Badminton Academy" ची स्थापना करून नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
ही अकॅडमी केवळ बॅडमिंटनचे प्रशिक्षण देणारी संस्था नसून, शिस्त, आत्मविश्वास, मेहनत आणि विजेतेपणाची मानसिकता घडवणारे केंद्र ठरणार असल्याचे सुधांशू ठाकूर यांनी सांगितले.
बॅडमिंटनमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच लहान वयापासून व्यावसायिक प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी एक उत्तम संधी उपलब्ध करून देणार आहे.
प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क : 8369901067
Kalyan, Thane | Jun 28, 2026