हिंगणा: नागपुरात १८ एप्रिलकरिता उष्ण लाटेचा इशारा'यलो अलर्ट' दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
Hingna, Nagpur | Apr 17, 2026 भारतीय हवामान विभागाकडून नागपूर जिल्ह्यात शनिवार, १८ एप्रिल रोजी उष्णतेचा 'वेलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.नागपुरात मागील चार दिवसांपासून तापमान ४१ अंशांच्या वर गेले आहे. बुधवारी ४३.४ अंश सेल्सिअस, तर गुरुवारी) जिल्ह्यात ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली .