पोलादपूर: रायगडात 2025-26 मध्ये 125 विनयभंगाच्या घटना
रायगड जिल्ह्यात 2025 ते एप्रिल 2026 या 16 महिन्यात 125 विनयभंगाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात कायदे अस्तित्वात असले तरी अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. 2025 ते एप्रिल 2026 या काळात एकट्या रोहा पोलिस ठाण्यामध्ये विनयभंगाचे 16 गुन्हे दाखल आहेत. खालापूर व कर्जत 12 तर अलिबाग पोलिस ठाण्यात 11 गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात इतर पोलिस ठाण्यातही विनयभंगाचे गुन्हे नोंद असून यामुळे महिलांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.