पोलादपूर: पोलादपूर देवळे धरणाच्या कामाला गती मिळणे गरजेची
राज्यात पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असते यावर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार सह इतर अनेक योजना आणल्या आहेत. यापैकी काही योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आल्याने गावातील पाणी प्रश्न मार्गी लागण्याची चर्चा, प्रसिद्धी पत्रकाद्वारे ऐकण्यात वाचण्यात आल्या असे असले तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत गावागावात समाज मंदिरांच्या बरोबरीने जलमंदिर, बंधाऱ्यांच्या विकासकामांसाठी व त्या तातडीने मंजुरी करत बांधण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, जेणेकरून वर्षभर पाणी उपलब्ध होईल व पाण्याची बचत होऊन पाणी टंचाईवर मात करणे सुलभ होणार आहे.