धुळे: जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयात 'मुद्देमाल हस्तांतरण समारंभ' पार पडला
Dhule, Dhule | Aug 28, 2024 विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मुळ मालक तथा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम धुळे पोलीस मुख्यालय येथे पार पडला. या समारंभात एकुण ८० लाखाच्या मुद्देमाल ज्यामध्ये ट्रॅक्टर, मोटरसायकल, सोने चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम अशा वेगवेगळ्या मुद्देमालाचा समावेश आहे. सर्व उपस्थित फिर्यादींना त्यांचा मुद्दमाल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या उपस्थितीत परत करण्यात आला.