धुळे: मुख्यमंत्री सहायता कक्षातून दोन वर्षात 285 कोटी निधीतून पस्तीस हजार रुग्णांची वाचवले प्राण- राज्य प्रमुख राम राऊत
Dhule, Dhule | Aug 28, 2024 ना वशिला ना ओळख, इथे थेट मदत असे ब्रीद वाक्य असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. गेल्या दोन वर्षात 285 कोटी निधीतून पस्तीस हजार रुग्णांचे प्राण वाचवले असल्याची माहिती आज मुख्यमंत्री सहायता कक्षाचे राज्यप्रमुख रामराव यांनी डॉक्टर देशपांडे सभागृह येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळेस या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.