🚨 डिजिटल डिटेंशनच्या फसवणुकीपासून सावध राहा! 🚨
📱 तुमच्या नावावर पार्सल आहे, ड्रग्ज सापडले आहेत किंवा तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे, असे सांगून घाबरवणारे फोन किंवा व्हिडिओ कॉल येऊ शकतात. पोलीस असल्याचे भासवून तुमची वैयक्तिक माहिती, OTP आणि पैशांची मागणी केली जाऊ शकते.
⚠️ लक्षात ठेवा!
🔹 पोलीस असल्याचे सांगणाऱ्या प्रत्येक कॉलवर विश्वास ठेवू नका.
🔹 WhatsApp व्हिडिओ कॉलवरून पोलीस कारवाईची भीती दाखवणाऱ्यांपासून सावध राहा.
🔹 AI च्या मदतीने बनवलेले बनावट आवाज, फोटो आणि व्हिडिओ खरे वाटू शकतात.
🔹 कोणालाही OTP, बँकिंग माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.
🔹 कोणत्याही संशयास्पद दाव्याची अधिकृत माध्यमातून पडताळणी करा.
💰 तुमच्या मेहनतीची कमाई सुरक्षित ठेवा. घाबरू नका, फसवणुकीला बळी पडू नका!
📞 सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर संपर्क साधा.
नागपूर शहर पोलीस — विश्वास, सुरक्षा आणि सेवा. 👮♂️
#NagpurCityPolice #CyberSafety #DigitalArrestScam #CyberFraud #StayAlert
127 views | Nagpur, Maharashtra | Oct 15, 2026