चिंच्या मण्या गँग’वर पोलिसांचा दणका!
इचलकरंजी परिसर आणि करवीर तालुक्यातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
⚖️ ‘चिंच्या मण्या गँग’च्या सदस्यांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित असून, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
👮 सामाजिक शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येत आहे.
गुन्हेगारीला थारा नाही; कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची कठोर भूमिका! 🚔
#KolhapurPolice #Ichalkaranji #Karveer #CrimeControl #LawAndOrder
141 views | Kolhapur, Maharashtra | Sep 11, 2026