नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार-इंगळवाडी येथील खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व बेपत्ताबेपत्ता अल्पवयीन मुलीचे बचावकार्य तातडीने सुरू केले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी स्वतः बोटीतून शोधमोहीमेत सहभाग घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार बांधव यांच्या सहकार्याने खाडीपात्रात व परिसरात रात्रंदिवस शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, समुद्रकिनारे, खाडीपात्रे, नद्या व अन्य जलक्षेत्रांमध्ये वा
7 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 12, 2026