जाफराबाद: अंधेरी येथे शेत ताबा घेण्याच्या कारणावरून दोन परिवारात वाद, सतीश हाके यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेत दिली माहित
आज दि. 26 जून 2026 वार शुक्रवार रोजी रात्री 9 वाजता जाफराबाद ता.अंधेरी येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश हाके यांनी त्यांचे आई वडील काका काकू यांना सोबत घेऊन थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले आहे,काल दि. 25 जून रोजी शेती ताबा घेण्याच्या कारणावरून सुनील वसंतराव देशमुख याने शेती ताबा घेण्यासाठी काही गुंड घेऊन आला व हाके यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी त्यांनी जाफराबाद पोलीस ठाणे गाठले मात्र तेथे तक्रार नाही घेतल्याने त्यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.