जाफराबाद: शहरातील माहोरा रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी,आपापसात काही ठिकाणी वाद
आज दिनांक 24 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील माहोरा रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले आहे, याप्रसंगी या तात्या उन्हातही शेतकऱ्यांनी लांबच लांब रांगा पेट्रोल पंप परिसरात लावल्या होत्या तर अगोदर नंबर कोणाचा याहून शेतकरी आपापसात वाद झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले आहे, मात्र पेट्रोल पंप चालकाने दोन्हीही गटातील शेतकऱ्यांची समजूत काढून व्यवस्थित डिझेल वाटप केले आहे.