अमरावती: नागपुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपुरी गेट ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी १४ डिसेंबर रोजी अटक केली. जब्बार खान रउफ खान (वय २८, रा. अन्सार नगर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तिन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. त्याच्याजवळील २ लाख ५३ हजाराचा ४४० रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.