रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व मद्यपी वाहनचालकांविरोधात पोलीसांची प्रभावी कारवाई.
मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, श्री. सदानंद दाते (भा.पो.से) यांच्या आदेशान्वये तसेच मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन बगाटे (भा.पो.से ) यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दि. ०१ जानेवारी २०२६ पासून आजअखेर रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व दारूबंदी संदर्भात एकूण ४८७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये ₹३०,२०,७८३/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध २१३ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मद्यपान करून वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण करणारे कृत्य आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.
तसेच, अवैध मद्यविक्री, मद्यनिर्मिती अथवा मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ डायल ११२, रत्नासेतू चॅटबॉट किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #ratnagiri #RatnagiriPolice
247 views | Ratnagiri, Maharashtra | Jun 5, 2026