हिंगणघाट: समुद्रपुर येथे १० ऑगस्टला होणाऱ्या आरोग्य शिबिराचा तळागाळातील रुग्णांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करा: आमदार कुणावार
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या पुढाकाराने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्यावर १० ऑगस्ट रोजी समुद्रपुर शहरात महाआरोग्य शिबिराच्या आयोजना करण्यात येणार असून या शिबिराच्या यशस्वीतेकरीता आमदार कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की या शिबीराचा तळागाळातील रुग्णांना मिळवून देणे हि सर्वांची जबाबदारी आहे.