पोलादपूर: पोलादपूर तालुक्यात 'आगोट'च्या तयारीचे महिलांना वेध
पावसाळा सुरू होण्यास अजून महिनाभराचा अवकाश आहे. परंतु पावसाळ्यासाठी लागणारे बेगमीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची दुकानातून गर्दी करताना दिसून येत आहे. बाजारातून कांदे, बटाटे, लसूण, मसाल्याचे पदार्थ शिवाय सुक्या मासळीच्या खरेदीवर सर्वसामान्यांचा विशेष भर आहे. दरवर्षी महाड बाजारपेठ व तालुक्यात देशी कडधान्यांची लाखो रुपयांची उलाढाल केवळ दोन महिन्यांतच होत असते. कडधान्यांमध्ये महाडचा वाल, नरवणची चवळी, गोरेगावचे मूग व महाडची मटकी प्रसिद्ध आहे. सर्व कडधान्यांची मिळून 60 ते 70 टनाची विक्री होत असते.