पारशिवनी तालुक्यात बिबट्याची दहशत: हिंगणा (बाराभाई) येथे आज बुधवार पहाटे चार वाजता च्या दरम्यान गोठ्यात घुसून कारवड ठार
पारशिवनी तालुक्यात बिबट्याची दहशत: हिंगणा (बाराभाई) येथे आज बुधवार पहाटे चार वाजता च्या दरम्यान गोठ्यात घुसून कारवड ठार; तीन महिन्यांत ५ जनावरांची शिकार केली तसेच तालुक्यातील हिंगणा (बाराभाई) शिवारात बुधवार २८ आक्टोबर पहाटे चार वाजता च्या दरम्यान बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच येथील शेतकरी श्री. श्रावण बाजीराव महाल्ले यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या कारवडीवर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला चढवून तिला जागीच ठार केले.