पोलादपूर: रायगडात पुन्हा तटकरे विरुद्ध गोगावले संघर्षाचा भडका?
रायगडसह कोकणामध्ये शिवसेनेचीच ताकद असून संख्याबळ देखील शिवसेनेचेच आहे त्यामुळे विधान परिषद आमदारकी शिवसेनाच लढवणार, कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. रायगडच्या पालक मंत्रीपदासह विधानपरिषद आमदार सुद्धा आमचाच होणार, असा निर्धार शिवसेनेचे रायगड जल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी रायगड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे.