जाफराबाद: जाफराबाद पोलिसांनी विदर्भात जाऊन हत्या करणाऱ्या 2 आरोपींना ठोकल्या बेड्या, पो.नि.सतीश जाधव यांची पोलीस ठाणे येथे माहिती
आज दिनांक 7 जून 2026 वार रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी पोलीस ठाणे जाफराबाद येथे प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे की 27 मे रोजी जाफराबाद शहरातील प्रसिद्ध मिरची व्यापारी शेख मोहसीन शेख मज्जित यांची धारदार शासनाने हत्या जंजाळवाडी शिवारात झाली होती, यात महेश ज्ञानदेव सोनवणे, निलेश पवार या दोन संशयितांना पोलिसांनी आज ताब्यात घेतल्या असून न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडीच सुनावली आहे.