बिहारमध्ये एटीएम फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; म्होरक्यासह तिघांना अटक
बिहारमध्ये एटीएम फसवणूक करणाऱ्या टोळीचा पाटणा येथे पर्दाफाश करण्यात आला आहे. गया आणि नवादा परिसरात एटीएमद्वारे फसवणुकीचे प्रशिक्षण देणाऱ्या या टोळीतील म्होरक्यासह तीन जणांना अटक करण्यात आली. एटीएम कार्ड बदलून तसेच मशीनमध्ये कार्ड अडकवून नागरिकांच्या बँक खात्यांतून पैसे काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या टोळीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
#BiharNews #ATMFraud #viralvideo #PatnaPolice #CrimeNews
Pune City, Pune | Oct 16, 2026