हिंगणघाट: अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांची मोठी कारवाई, संत गोमाजी वार्डातील पानठेल्यातून जप्त ४ लाख ५० हजार रुपयांची दारू जप्त
हिंगणघाट शहर पोलीस ठाण्याच्या डिबी पथकाने संत गोमाजी वार्डात अवैध दारू साठवूनक व विक्री विरोधात मोठी कारवाई करीत तब्बल ४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या देशी दारुने भरलेले ४५ पेट्या जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संत गोमाजी वार्डात एका टिनाच्या पानठेल्यातून अवैध दारूची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून पानठेल्याची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारुचा जखीरा आढळून आला यावेळी पोलिसांनी ४५ पेट्या दारू जप्त केली.