हिंगणघाट: तालुक्याला मोतीबिंदू विरहित करायचा आहे आमदार समीर कुणावार यांचे प्रतिपादन
महाराष्ट्राचे लोकप्रिय व विकासाभिमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘निरामय हिंगणघाट’ या अभियानांतर्गत उपजिल्हा रुग्णालयात येथे मोतीबिंदू मुक्ती तालुकास्तरीय महाआरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिरात ४००० हून अधिक नागरिकांची तपासणी होऊन अनेकांना मोफत वैद्यकीय सेवा व उपचार उपलब्ध करून देण्यात आले.विशेष म्हणजे, शिबिरादरम्यान पावसाची आकस्मिक हजेरी असतानाही नागरिकांचा उत्साह कुठेच कमी झाला नाही. आरोग्याची काळजी घेण्याचा जणू जनतेने निर्धारच केला होता