हिंगणघाट: कृषी सोलर पंपाचीची सक्ती हटवा: शिवराय संघटना अध्यक्ष नितीन सेलकर यांची राज्यशासनाकडे मागणी #jansamasya
राज्य सरकारने विहीवरून सिंचनासाठी मागेल त्याला सोलर पंपची सक्ती केली आली आहे,यामध्ये सोलर पंप लावल्यास “कुसुम सोलर योजने” अंतर्गत ९० टक्के अनुदान सुद्धा सरकार देत आहे,परंतु राज्यात सोलर पंप दुरुस्ती करणारी सरकारी यंत्रणा अद्याप तरी कार्यान्वित झालेली नाही, वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनल फुटल्यास किवा उडून गेल्यास पाच वर्षापर्यंत फक्त कंपनी सेवा दुरुस्ती देणार आहे,मात्र पाच वर्षानंतर पैनल फुटल्यास किवा उडल्यास शेतकऱ्यांना स्वतः दुरुस्ती करायचे आहे,