हिंगणघाट: नागपूर खापरी येथून कारने ९ वर्षाच्या मुलाला घेऊन निघालेल्या मनोरुग्णाला११२ पथकाने रिलायन्स पेट्रोलपंप वरुन घेतले ताब्यात
नागपूर जिल्ह्यातील खापरी येथून ९ वर्षाच्या लहानच्या मुलाला कार क्रमांक एम एच ४०एच५६२८ मध्ये बसवून एक मनोरुग्ण नागपूर हैदराबाद मार्गावने हिंगणघाट जवळील रींमडोह परीसरातील रिलायन्स पेट्रोलपंपवर आला यावेळी तो वेळ्यासारखा करीत होते. यामुळे हा मनोरुग्ण असल्याचे लक्षात येताच याची माहिती हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या ११२ टिमला फोन करून देण्यात आली टिमने तात्काळ पेट्रोलपंप गाठून सतर्कता दाखवित मनोरुग्ण व९वर्षाच्या मुलाला ताब्यात घेऊन त्यांचा नातेवाईकाचा शोध घेऊन त्यांच्याशी त्यांच्या स्वाधीन केले