अमरावती: जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेतील पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार, अध्यक्ष व संचालक मंडळावर राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत घेण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.राजापेठ पोलिसांनी तक्रारीच्या आधारे हमालपुरा येथील अमरावती जिल्हा परिषद शिक्षक बँकेचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह तत्कारीन संचालक मंडळाच्या सर्व सदस्यविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे,अशी माहिती 14 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्राप्त झाली.