शहादा: लोकसभेच्या निवडणुकीत पोलीस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांची माहिती
नंदुरबार लोकसभेची निवडणूक फ्री अॅण्ड फेअरच्या वातावरणात व्हाव्यात यासाठी पोलिस विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती, पोलिस अधिक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली.पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत श्रवण दत्त बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर उपस्थित होते.