शहादा: बायपास रस्त्यावरील दोंडाईच्या चौफुलीजवळ चाकू बाळगताना आढळून आलेल्या दोघांवर शहादा पोलिसांत गुन्हा दाखल
शहादा बायपास रस्त्यावरील दोंडाईचा चौफुलीजवळ युवक विनापरवाना बेकायदेशीररित्या चाकू बाळगतांना पोलिसांना मिळून आल्याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बायपास रस्त्यावरील दोंडाईचा चौफुलीजवळ संजय नाना ठाकूर व त्याचा साथीदार ईश्वर संजय चौधरी यांच्यावर ३ मार्चला दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला.