शहादा: आडगाव येथे पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात गायीचे वासरू ठार
तालुक्यातील आडगाव व परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून आज पहाटे गायीच्या वासरावर हल्ला करून ठार केले. या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच जितेश रावताळे यांनी केली आहे. सद्यस्थितीत गहू, हरभऱ्याची मळणी, तर काही ठिकाणी शेती तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.