शहादा: उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे पत्रकारांना नंदुरबार येथील स्व.अटल बिहारी वाजपेयी सभागृहात हेल्मेट वाटप
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने पत्रकारांना आज दिनांक 6 मार्च रोजी दुपारी १२ वाजता नंदुरबार येथील नगरपालिकेच्या स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार रमाकांत पाटील, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे किरण बिडकर, हिरालाल चौधरी, विशाल माळी व नंदुरबार तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.