शहादा: बोगदा पाडून नर्मदेचे पाणी शहादा तालुक्यात आणणार, खासदार डॉ. हिना गावित यांची माहिती
नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी आणि नर्मदेचे वाहून जाणारे पाणी इथल्या शेतीसाठी उपयोगी यावे आणि येथील शेती सुजलाम सुफलाम व्हावी; हे माझ्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करणारच; असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच खासदार डॉक्टर हिना गावित यांनी धडगाव लगतचा डोंगराळ भाग फोडून बोगद्याच्या माध्यमातून नर्मदेचे पाणी शहाद्यापर्यंत आणण्याच्या कामाला मोदी सरकार मुळे गती मिळाली असून सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली.