श्रीवर्धन: श्रीवर्धन प्रांत कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
सातबारा उताऱ्यातील दुरुस्तीच्या कामासाठी ६० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीवर्धन प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून नितीन पवार आणि शिपाई सचिन पाटील यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. म्हसळा तालुक्यातील पाभरे येथील एका शेतकऱ्याला सातबारा उताऱ्यातील दुरुस्तीसाठी मागील अनेक दिवसांपासून प्रांत कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र काम होत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याने हे काम करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.