पाचोरा शहरातील हुतात्मा स्मारक येथे आज शनिवार दि. ९ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधिक्षक डी. एस. मराठे, प्रसाशकीय अधिकारी चैतन्य राऊत, विद्युत अभियंता योगेश रेवेकर यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.