अर्जुनी मोरगाव: सडक अर्जुनीत तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सव संपन्न
सडक अर्जुनी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा आणि कृषी विभागांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित केला गेला. स्थानिक महिला बचत गट आणि शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री केली. आमदार राजकुमार बडोले यांद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.