दिनांक 18फेब्रुवारी 26 जिल्हा मानसिक आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत गोंदिया येथील अर्बन हेल्थ सेंटर येथे नुकताच जागतिक एपिलेप्सी जनजागृती दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्तम पटले यांनी आवाहन केले की गोंदिया जिल्ह्यात सर्व ग्रामीण रुग्णालयात मानसिक रोग आणि मीरर्गी या आजारावर मोफत उपचार उपलब्ध आहेत मनशक्ती क्लिनिक द्वारे मानसोपचार तज्ञां मार्फत शास्त्रोक्त पद्धतीने मोफत उपचार केला जातो