भंडारा: गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे यांना पोलिसांनी खैरी पून. येथे ठेवले नजरकैदेत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 5 जुलै रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून भंडारा बायपास मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांचा भंडारा जिल्हा दौरा असल्याकारणाने गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा भंडारा तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते भाऊ कातोरे यांना खैरी पुनर्वसन येथे त्यांच्या राहत्या घरी जवाहरनगर पोलिसांनी 5 जुलै रोजी पहाटे 5:30 वा. नजरकैद केले.