पेण: पेण अर्बन बँक ठेवीदारांच्या पैशांचा तिढा सुटणार?
Pen, Raigad | Jun 30, 2026 बुडीत निघालेल्या पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे एकूण १ लाख ९८ हजार ठेवीदार असून, गेल्या सोळा वर्षांच्या प्रदीर्घ कायदेशीर लढ्यात न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत तब्बल ६०० ठेवीदारांचे निधन झाले आहे. या हवालदील झालेल्या सर्व ठेवीदारांच्या एकूण ६५० कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या असून, आता या पैशांचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहेत.