पुण्याचं पाणी नेमकं गेलं कुठं? पुण्यात पाणीटंचाईचे भीषण संकट! दिवाळीत पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांची वणवण
नऱ्हेगावात पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून दिवाळीच्या सणावरही त्याचा परिणाम झाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर असल्याचा दावा केला जात आहे की, आंघोळ तर दूरच, पण पिण्यासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया गोविंद गडकरी यांनी व्यक्त केली.
एकीकडे महागाई आणि दुसरीकडे पाणीटंचाई, अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. प्रशासन आणि सरकारने तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
#Pune #WaterCrisis #WaterShortage #Diwali #MaharashtraNews गोविंदगडकरी पाणीटंचाई नऱ्हेगाव