अकोला : जिल्ह्यातील अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत दोन दिवसांची धडक मोहीम राबवली. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ९२ ठिकाणी कारवाई करून १२ लाख १२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत ९५ गुन्हे दाखल झाले. अवैध धंद्यातील साहित्य नष्ट करण्यात आले असून, पोलिस प्रशासनाने अशी कारवाई पुढेही सुरू राहील, असे दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता प्रसिद्धीपत्रका द्वारे सांगितले.