खडगपूर रेल्वे स्थानकावर GRP ची मोठी कारवाई; प्रवाशाच्या बॅगेत सापडले १.४० कोटी रुपये!
पश्चिम बंगालमधील खडगपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी (GRP) मोठी कारवाई करत एका प्रवाशाच्या बॅगेतून तब्बल १ कोटी ४० लाख रुपये रोख जप्त केले आहेत. राहुल सोनी असे संबंधित प्रवाशाचे नाव असून, तो सकाळी सुमारे ११ वाजता जनशताब्दी एक्स्प्रेसने खडगपूर स्थानकात पोहोचला होता. हावडा येथे जाण्यासाठी तो स्थानकावर थांबला असताना ही रोकड आढळून आली. एवढी मोठी रक्कम कुठून आणली आणि तिचा उद्देश काय होता, याचा GRP पोलीस तपास करत आहेत.
#KharagpurRailwayStation #GRP #RailwayPolice #CashSeizure #140CroreCash #WestBengalNews #KharagpurNews