कर्जत: कर्जतच्या रेल्वे प्रश्नासाठी मुरलीधर मोहोळ यांना साकडे
Karjat, Raigad | Apr 11, 2026 मुंबई-पुणे मध्य रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले कर्जत रेल्वे स्थानक हे अनेक समस्यांनी घेरले आहे. कर्जत रेल्वे स्थानकांतील अनेक समस्यांप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडे घालण्यात आले आहे. कर्जत रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना, कर्जतकर नागरिक, वैयक्तिक काहींनी अशी अनेक निवेदन देऊन खुद्द रेल्वे मंत्र्यांची कर्जत रेल्वे स्थानकावर भेट घेतली, मात्र कर्जतच्या समस्या काही सुटत नाही.