शहादा: पिंगाणे येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले, शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील पिंगाणे येथून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने तिचा अज्ञान पणाचा फायदा घेऊन पळून गेले आहे ही घटना घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी तिचा विविध ठिकाणी शोध घेतला असता मात्र मिळून आली नाही. त्यामुळे शहादा पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करीत आहेत.