शहादा: कुरंगी गावाच्या नाल्याजवळ 4 लाख 81 हजाराचा दारू साठा व वाहन पोलिसांनी केले जप्त, शहादा पोलिसात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील कुरंगी गावाच्या नाल्या जवळ शहादा पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून दारू साठा जप्त केल्याची कारवाई केली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहादा येथील तपासणी नाक्यावर सापळा रचला असता यावेळी पोलिसांना एका वाहनावर संशय आल्याने ते वाहन कुरंगी गावाजवळील नाल्यानजीक थांबवले असता वाहनात चार लाख 81 हजार रुपये किंमतीचा दारू साठा व कार जप्त करण्यात आली आहे.