पोलादपूर: रायगड जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ २.६ टक्के पाऊस
कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाने अत्यंत संथ गतीने सुरुवात केली आहे. जून महिना अर्धा संपला तरी रायगड जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. १५ जून पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत अवघा २.६ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. मागील वर्षी २०२५ मध्ये याच कालावधीत जिल्ह्यात तब्बल ५३ टक्के पाऊस झाला होता, ज्याच्या तुलनेत यंदा पावसाने मोठी ओढ दिली असल्याचे स्पष्ट चित्र आहे.