सावनेर: भागीमहारी टोलनाकाजवळ कोळशाच्या ट्रकला आग
Savner, Nagpur | May 7, 2026 उमरेडवरून इंदोरकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला भागीमहारी टोल नाका परिसरात गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजता अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच हित ज्योती आधार फाउंडेशनची टीम तातडीने घटनास्थळी रवाना झाली. तसेच सावनेर नगरपरिषदेला कळविण्यात आले असून नगरपरिषद अग्निशमन पथकाने तात्काळ दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून पुढील तपास सुरू आहे.