कर्जत: माथेरान न.प. निवडणुकीत शासकीय वाहनाचा गैरवापर
Karjat, Raigad | Jun 26, 2026 माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी निवडणूक आचारसंहिता काळात शासकीय वाहनाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील कार्यवाहीसाठी आयोगाने हा अर्ज रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या १९ मे २०२६ रोजीच्या पत्रानुसार, कर्जत येथील दिगंबर चंदने यांनी ११ मे २०२६ रोजी सादर केलेला अर्ज आयोगास १४ मे रोजी प्राप्त झाला होता.