हिंगणघाट: शेगाव,पाठर ,बेलघाट नंदोरी मार्गे नवीन एसटी बस सुरू करा:भाजपा जिल्हा सचिव संजय डेहणे यांची आगार प्रमुखाकडे मागणी
हिंगणघाट शेगाव पाठर बेलघाट नंदोरी मार्गे नवीन एसटी बस सुरू करण्याची मागणी भाजपा जिल्हा सचिव संजय डेहणे यांनी आगार प्रमुख शेंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समीर भाऊ कुणावर यांनी सुद्धा वरिष्ठांशी चर्चा करू ही बस लवकरात लवकर चालू करण्याच्या सूचना केल्या निवेदन देतेवेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव श्री संजय डेहणे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश राऊत बेलघाट येथील गजाननराव राऊत उपस्थित होते